मजही भीड नुलंघवे – संत निळोबाराय अभंग – ८४२
८४२मजही भीड नुलंघवे । जें त्या पुसावें मनोगत ॥१॥ सर्वही भावें सेवाऋणी । मजचि करुनी सोडियलें ॥२॥ आशा मात्र नाहीं याशीं । जे कां देहासी नाठविती ॥३॥ निळा म्हणे घातली मिठी । कल्प कोटी न सुटेशी ॥४॥