संत निळोबाराय अभंग

रुप विक्राळ भयानक – संत निळोबाराय अभंग ८४

रुप विक्राळ भयानक – संत निळोबाराय अभंग ८४


रुप विक्राळ भयानक ।
चुंचु वाढिलें अधिकाधिक् ।
पक्ष पसरोनियां अधोमुख ।
रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥
क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं ।
येरें पक्ष धरिलें करीं ।
उपटूनियां सांडी पृथ्वीवरी ।
आपार वातें उसळलें ॥२॥
लोक मिळाले भोवतें ।
परीं भिताती देखोनियां त्यातें ।
मग धरुनियां चंचूतें
दोन्ही फाळी करुं पाहे ॥३॥
अनंत हस्तांचा श्रीधर ।
काय ते काउळे किंकर ।
परी तो मायावी असूर ।
खग वोडणेंसी ठाकला ॥४॥
कृष्णें लत्ताप्रहारें त्यांसी ।
पाडियलें तोंडघसी ।
धरुनीयां निजकेशीं ।
आपणासीं ओढियेला ॥५॥
दक्षिणकरें मुष्ठीप्रहरीं ।
हाणितलें त्या शिरावर
मस्तक फुटतां मेंदूवरी ।
शोणित वाहे भडभडां ॥६॥
निळा म्हणे दीर्घपापी ।
कागरुपिया अति विकल्पी ।
परी हा परमात्मा पुण्यप्रतापी ।
मोक्षपदासी पाठविलां ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रुप विक्राळ भयानक – संत निळोबाराय अभंग ८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *