याचिया रुपाचें चिंतन । करितां तनु मन वेधलें ॥१॥ देहीं नुरता देहभाव । झालों स्वयमेव तेंचि रुप ॥२॥ नाईकती शब्दा श्रवण । दुजिया नयन न देखति ॥३॥ निळा म्हणे बावरी ऐसी । दिसें लोकांसी प्रीति वरी ॥४॥