ऐसें जाणोनियां श्रीहरि – संत निळोबाराय अभंग ८३
ऐसें जाणोनियां श्रीहरि ।
पालखी निजविल्या रुदन करी ।
न राहे अंकीही क्षणभरी ।
निवितां शेजारी तैसाची ॥१॥
काय करुं गे यशोदा म्हणे ।
कां हे करितीहे रुदनें ।
दिठावलें माझें तान्हें ।
निंबलोण उतरी तया ॥२॥
तरी न राहे रुदतां ।
अधिक् अधिक् आक्रंदतां ।
यशोदा म्हणे बाहेरी आतां ।
नेऊं तरी कोणाकडे ॥३॥
मग घेऊनियां कडियेवरी ।
काग दाविला निंबाबरी ।
तया देखोनियां हास्य करी ।
मग ते सुंदरी हरिखली ॥४॥
म्हणे निजऊनियां येथें ।
करीन कामकाज ऐसें ।
विचारुनियां चित्तें ।
म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥
ऐशापरी निजविला ।
क्षण एक काजकामीं गेला ।
तंव काग तेथूनियां उठविला ।
झडपूं आला गोविंदा ॥६॥
देखोनी यशोदा घाबरी ।
हाहाकार केला इतरीं ।
निळा म्हणे तो असूरी
हरीचीवरी झेपावला ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ऐसें जाणोनियां श्रीहरि – संत निळोबाराय अभंग ८३