वेडा नव्हे मुका चतुर – संत निळोबाराय अभंग – ८२४
वेडा नव्हे मुका चतुर शहाणा ।
बोले अबोलणा मौनावस्था ॥१॥
विष्णुदासा निळा वाचा विदेहता ।
अंगी सप्रेमता आवडीची ॥२॥
ह्रदयीं चतुर्भुज मेघशाम मूर्ती ।
मुखीं नामकीर्ति ब्रीदावळी ॥३॥
नेणता म्हणोनि संत आपंगिला ।
निळा निरविला पांडुरंगा ॥४॥