पूर्वील कथा अनुसंधान – संत निळोबाराय अभंग ८२
पूर्वील कथा अनुसंधान ।
राहिलें होतें करितां कथन ।
मतिविस्ताराचे महिमान
स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥
माभळभट गेलीया वरी ।
कागासुर तो माव करी ।
येऊनियां गोकुळा भीतरी ।
बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥
म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे ।
बाळका करीन मी आंधळे ।
चुंचचिघातें कंठनाळें ।
फोडीन वृक्षस्थळीं बैसोनी ॥३॥
काय करील तें लेकरुं ।
मनुष्य मानवी ते इतरु ।
आम्हां दैत्यांचा आहारु ।
कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥
कंसाचिये आज्ञे भेणें ।
करितो मनुष्यांची संरक्षणें ।
आतां तों प्रेरिलेंसे तेणें ।
आड आलिया निवटीन ॥५॥
आलिया त्याचिया कैवारा ।
आकळूं झकें मी इंद्रादिसुरां ।
मज कोपलिया कृतातवीरा ।
कोण सामोरा येऊं शके ॥६॥
निळा म्हणे ऐशिया मदें ।
मातला मनेशींचि अनुवादें ।
कंसा तोषवीन आनंदे ।
प्रतीक्षा करी कृष्णाची ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पूर्वील कथा अनुसंधान – संत निळोबाराय अभंग ८२