पडतांचि तें वचन कानीं – संत निळोबाराय अभंग – ८०८

पडतांचि तें वचन कानीं – संत निळोबाराय अभंग – ८०८

पडतांचि तें वचन कानीं ।
धरिती मनीं अत्यादरें ॥१॥
सुकृताचीं उत्तम फळें ।
आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥
सुखीं सांठवलें सुख ।
हरिखा हरिख भेटला ॥३॥
निळा म्हणे कल्प कोटी ।
पडली गांठीं हरीसवें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पडतांचि तें वचन कानीं – संत निळोबाराय अभंग – ८०८