संत निळोबाराय अभंग

शृंगें पसरिले जैसे शूळ – संत निळोबाराय अभंग ८०

शृंगें पसरिले जैसे शूळ – संत निळोबाराय अभंग ८०


शृंगें पसरिले जैसे शूळ ।
नेत्रींहूनि निघती ज्वाळ ।
श्वास रंध्रीं धूमकल्लोळ ।
डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥
मागें सरे पुढे धांवे ।
आडवाचि उडे उंच उंचावे ।
ऐशीं दावूनियां लाघवें ।
हरिसन्निध पातला ॥२॥
देव हाणे मुष्टी घातें ।
तेणें आर्डाय दुखवोनि तेथें ।
सवेंचि सरसावोनियां वरिते ।
उपसों धांवे गोंविंदा ॥३॥
दोघां मांडलें महार्णव ।
दाविती बळ प्रोढीगौरव ।
मग धेनुकें करुनियां ।
कृष्णातळीं संचारला ॥४॥
येरें रगडूनि तेथेंचि धरिला ।
दोन्ही शिंगी हात घातला ।
मग ते उपटुनी त्राहाटिला ।
निघात घातें खडकावरी ॥५॥
ऐसा करुनियां शतचूर्ण ।
रक्त मांस त्वचा भिन्न्‍ा ।
अस्थि तिळप्राय होऊन ।
गेल्या उडोनि दाहिदिशा ॥६॥
निळा म्हणे ऐशियापरी ।
धेनुका मुक्तीची शिदोरी ।
देऊनि पाठविला श्रीहरि ।
आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शृंगें पसरिले जैसे शूळ – संत निळोबाराय अभंग ८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *