गडियां म्हणे पळतां घरें – संत निळोबाराय अभंग ८
गडियां म्हणे पळतां घरें ।
नवनितें क्षीरें असती ते ॥१॥
म्हणती गोवळ ऐके कान्हा ।
आहेसि तूं देखणा पुढें होई ॥२॥
आम्ही नेणो थारेमारे ।
अवघीं घरें तुज ठावीं ॥३॥
निळा म्हणे काढीं माग ।
आम्ही सवेग येऊं मागें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.