त्याचे पायीं माझी बुध्दी । जडली कधीं न ढळेची ॥१॥ ज्याचे ध्यानीं मनीं हरी । नामें वैखरी उच्चार ॥२॥ नित्य कीर्तनांचें घोष । करिती उल्हास आवडीं ॥३॥ निळा म्हणे त्यांची गोठी । ऐकतां पोटीं सुख वाटे ॥४॥