त्याचे पायीं माझी – संत निळोबाराय अभंग – ७९१
त्याचे पायीं माझी बुध्दी ।
जडली कधीं न ढळेची ॥१॥
ज्याचे ध्यानीं मनीं हरी ।
नामें वैखरी उच्चार ॥२॥
नित्य कीर्तनांचें घोष ।
करिती उल्हास आवडीं ॥३॥
निळा म्हणे त्यांची गोठी ।
ऐकतां पोटीं सुख वाटे ॥४॥
त्याचे पायीं माझी बुध्दी ।
जडली कधीं न ढळेची ॥१॥
ज्याचे ध्यानीं मनीं हरी ।
नामें वैखरी उच्चार ॥२॥
नित्य कीर्तनांचें घोष ।
करिती उल्हास आवडीं ॥३॥
निळा म्हणे त्यांची गोठी ।
ऐकतां पोटीं सुख वाटे ॥४॥