ऐसें विचारुनियां मनीं – संत निळोबाराय अभंग ७९
ऐसें विचारुनियां मनीं
म्हणे सौगडियां सारंगपाणी ।
बैल चांगला दिसतो नयनीं ।
परी धारुं कैसा देईल ॥१॥
तुम्ही व्हारे पैलीकडे ।
दुरी परते वेंघोनि हुडे ।
चौताळातां हा चहूंकडे ।
करील रगडा सकळांचा ॥२॥
ते म्हणती बरें कृश्णा ।
परी तूं सांभाळीं हो आपणा ।
ऐसें म्हणोनियां पळती राणा ।
गिरींशिखरीं बैसले ॥३॥
मग कास घालूनि गोपीनाथ ।
चालिला पुढें चुचकारित ।
तंव तो म्हणे आजी कार्यार्थ ।
बरा साधला एकांती ॥४॥
जवळी यावयाची वाट पाहे ।
उगाचि स्तब्ध उभा राहे ।
हें जाणोनियां यादवराव ।
अंग राखोनि चमकतु ॥५॥
ऐसा आटोपिला हरी ।
तंव ते मायावी आसुरी ।
धंविान्न्ला तयावरी ।
शिंगे पसरुनि विस्तीर्णें ॥६॥
निळा म्हणे फुंपात उठी ।
चौताळ लागे पाठीं ।
तंव हा परमात्मा जगजेठी ।
गांठी पडों नेदीचि ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.