झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥ विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥ बुध्दिनिश्चयाचें घर । तेहि झाली तदाकार ॥३॥ निळा म्हणे काया वाचा । मना संकल्प हा तयाचा ॥४॥