जेणें छत्र सिंव्हासन – संत निळोबाराय अभंग – ७८७

जेणें छत्र सिंव्हासन – संत निळोबाराय अभंग – ७८७

जेणें छत्र सिंव्हासन ।
दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥
काय उर्त्तीण होईजे रंकें ।
तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥
ज्याचिया कृपें ब्रम्हानंद ।
पावलों अगाध अक्षयी तो ॥३॥
निळा म्हणे साम्राज्यें लेणें ।
लेवविलें ईक्षणें कृपेचिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेणें छत्र सिंव्हासन – संत निळोबाराय अभंग – ७८७