जेणें माझी वाचस्पती – संत निळोबाराय अभंग – ७८६

जेणें माझी वाचस्पती – संत निळोबाराय अभंग – ७८६

जेणें माझी वाचस्पती ।
आपुल्या कृपें केली सरती ॥१॥
त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां ।
जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥
अवघेंचि त्यांचे घेणें देणें ।
मी हें माझें कांहीचि नेणें ॥३॥
निळा म्हणे ठेविलों ऐसा ।
जाळींचा बुदबुद जळींचि जैसा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेणें माझी वाचस्पती – संत निळोबाराय अभंग – ७८६