जीवभाव ठेवूं पायीं – संत निळोबाराय अभंग – ७८५
जीवभाव ठेवूं पायीं ।
तरी तो काय लटिकाचि ॥१॥
याचिलागीं लिगटलों ।
पायीं जडलों न ढळेसा ॥२॥
जेथें संतचरणरज ।
पडती सहज मी तेथें ॥३॥
निळा म्हणे याविण आतां ।
न दिसे अर्पितां उत्तीर्णपणा ॥४॥
जीवभाव ठेवूं पायीं ।
तरी तो काय लटिकाचि ॥१॥
याचिलागीं लिगटलों ।
पायीं जडलों न ढळेसा ॥२॥
जेथें संतचरणरज ।
पडती सहज मी तेथें ॥३॥
निळा म्हणे याविण आतां ।
न दिसे अर्पितां उत्तीर्णपणा ॥४॥