संत निळोबाराय अभंग

ऐशी अगाध चरित्रें याची – संत निळोबाराय अभंग ७७

ऐशी अगाध चरित्रें याची – संत निळोबाराय अभंग ७७


ऐशी अगाध चरित्रें याची ।
वर्णिता मागला शेष विरंची ।
लोक म्हणती हा सर्प बिलोंची ।
कैसेनि पां वांचला ॥१॥
मग त्या सांगे नारायण ।
यासी गेलें वर्ष होऊन ।
गोवळ वत्सें बहमसदन ।
पावोनि होते बैसले ॥२॥
कालिचिं ते आले येथे ।
म्हणोनि सांगती नूतन वातें बहमसदन ।
व्दिगुणपणे हे कैसोनि तुमतें ।
प्राप्त झाले कां नेणां ॥३॥
ऐसें सांगता श्रीहरी ।
अवघ्यां जाण्वलें अंतरी ।
परम लाघविया मुरारी ।
खेळ खेळे विचित्र ॥४॥
अधासुरा वाधिल्यावरी ।
पुढें धेनुंका बोहरी ।
कैसी केली याची परी ।
तंहि सुजाण परिसंतु ॥५॥
एकैक याचें कथानक ।
श्रवण भवबंधा मोचक ।
म्हणोनियां सात्विक लोक ।
हेंचि ऐकती अनुदिनी ॥६॥
निळा म्हणें हे बाळक्रीडा परी
परमार्थ साधनाचा हुंडा ।
श्रवण मनन होतांचि फुडा ।
ब्रम्हसाक्षात्कार पाविजे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐशी अगाध चरित्रें याची – संत निळोबाराय अभंग ७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *