संत निळोबाराय अभंग

तंव कृष्णाभोंवते गोवळ – संत निळोबाराय अभंग ७४

तंव कृष्णाभोंवते गोवळ – संत निळोबाराय अभंग ७४


तंव कृष्णाभोंवते गोवळ ।
भासती चतुर्मुखचि सकळ ।
करीत वेदघोश कल्लोळ ।
पदें क्रमें निरुक्तें ॥१॥
ब्रम्हा म्हणे हें नवल झालें ।
ते तेथिल येथें हे कोठूनि आले ।
चतुर्मुखहि दिसती भले ।
न कळे महिमान श्रीहरिंचें ॥२॥
मग जोडूनियां पाणीतळ ॥३॥
चरणीं ॥ ठेवूं इच्छी निढळ ।
त्राहें त्राहें जी मी केवळ ।
दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥
ऐसा एक सुवत्सर ।
करीत होता नमस्कार ।
म्हणे वत्सें आणि कुमर ।
आणवाल तरी आणितों ॥४॥
इकडे कृष्ण गोवळमेळीं ।
आपणासवें आपण धुमाळी ।
खेळत आला पर्वतातळी ।
आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥
चरतां पर्वत मस्तकीं गाई ।
ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं ।
मग उडया घालुनियां पाही ।
पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥
निळा म्हणे जगत्रयजीवन ।
वत्सें झाला असे आपण ।
यालागीं स्नेहाचें महिमान ।
अधिकाधिक् गाईपोटी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तंव कृष्णाभोंवते गोवळ – संत निळोबाराय अभंग ७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *