संत निळोबाराय अभंग

तैशींच वत्सें जिची जेसीं – संत निळोबाराय अभंग ७३

तैशींच वत्सें जिची जेसीं – संत निळोबाराय अभंग ७३


तैशींच वत्सें जिची जेसीं ।
होतीं होउनी ठेला तैसीं ।
बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं ।
तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥
बुजगीं मिसकिणें लातिरीं ।
ऐके खविरीं डिंबिरीं ।
एके अचपळें काविरीं ।
झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥
देखतां गांईसी फुटे पान्हा ।
घरींचिया लोभ उपजे मना ।
ऐशीं स्वरुपें होउनी नाना ।
खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥
येदनी ब्रम्हा पाहे डोळां ।
तंव पहिलिया ऐसाचि सोहळा ।
ध्वजा कुंचे घागरमाळा ।
तोरणें पताका उभविलीया
ऐसाचि सोहळा ॥४॥
शिंग काहाळा मोह्या पावे ।
गोवळ नाचतातीं सुहावे ।
वरी धरुनियां चांदिवे ।
भोवती खिलारें वत्सांची ॥५॥
ब्रम्हा म्हणे आणिलीं केव्हा ।
म्यां तों लपविलीं होती एकिसवा ।
जाऊनियां पाहे तंव तो मेळावा ।
जेधिल तेथें तैसाचि ॥६॥
निळा म्हणे लाविलें पिसें ।
ब्रम्हया येण्याजाण्याचाचिी वळसे ।
मग लज्जित होऊनियां मानसें ।
करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तैशींच वत्सें जिची जेसीं – संत निळोबाराय अभंग ७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *