दोरीचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक नोळखतां ॥१॥ तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे । सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥ लटक्याचि झकवणें दचक बैसला । परि तो प्राण गेला हरुनियां ॥३॥ निळा म्हणे तुम्हां कुंठितचि केलें । ऐसें माझें झालें कर्म बळी ॥४॥