संत निळोबाराय अभंग

दोरीचाचि सर्प परि होय – संत निळोबाराय अभंग – ७२७

दोरीचाचि सर्प परि होय – संत निळोबाराय अभंग – ७२७

दोरीचाचि सर्प परि होय मारक ।
संदेहकारक नोळखतां ॥१॥
तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे ।
सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥
लटक्याचि झकवणें दचक बैसला ।
परि तो प्राण गेला हरुनियां ॥३॥
निळा म्हणे तुम्हां कुंठितचि केलें ।
ऐसें माझें झालें कर्म बळी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दोरीचाचि सर्प परि होय – संत निळोबाराय अभंग – ७२७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *