दोन्ही डोळां अवलोकितां – संत निळोबाराय अभंग – ७२६

दोन्ही डोळां अवलोकितां – संत निळोबाराय अभंग – ७२६

दोन्ही डोळां अवलोकितां ।
धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥
चित्त वेधलें चिंतनें ।
मनहि तदाकारध्यानें ॥२॥
वाचा कुंठित राहिली ।
बुध्दिहि निमग्मचि ठेली ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगें ।
रंगली त्याची विठ्ठल रंगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दोन्ही डोळां अवलोकितां – संत निळोबाराय अभंग – ७२६