तैसे तुमच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७२५

तैसे तुमच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७२५

तैसे तुमच्या योगें थोर ।
आम्ही पामर जीवजंतु ॥१॥
गाऊं वानूं तुमच्या गुणा ।
तेणें भूषणा वाढलों ॥२॥
कस्तुरीसंगे मृतिका जैसी ।
विकें कनकेसी समान ॥३॥
निळा म्हणे पुरुषोत्तमा ।
अपार महिमा हा तुमचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तैसे तुमच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७२५