तुमच्या पायीं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥१॥ बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥ बरवें उच्चारिलें नाम । जिव्हें काम मारुनी ॥३॥ निळा म्हणे आठवण धरिला । बरवा सांगितला तो संतीं ॥४॥