तुमच्या पायीं ठेवितां – संत निळोबाराय अभंग – ७२३
तुमच्या पायीं ठेवितां चित्त ।
पुरले हेत सकळही ॥१॥
बरवें वर्म हें हाता आलें ।
संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥
बरवें उच्चारिलें नाम ।
जिव्हें काम मारुनी ॥३॥
निळा म्हणे आठवण धरिला ।
बरवा सांगितला तो संतीं ॥४॥