तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥ नुपेक्षी त्या पंढरिनाथा । जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥ निळा म्हणे भूमंडळीं । संत महाबळी विदीत ॥४॥