तुमच्या बळें नि:शंक – संत निळोबाराय अभंग – ७२१
तुमच्या बळें नि:शंक मनीं ।
गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥
कळिकाळ तोही वंदी माथा ।
तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥
नुपेक्षी त्या पंढरिनाथा ।
जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥
निळा म्हणे भूमंडळीं ।
संत महाबळी विदीत ॥४॥