तुमच्याचि चरणाचा महिमा ।
नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥
आम्हा दासांचें जीवन ।
घडे अमृताचेचि पान ॥२॥
वृक्ष नेणति फळाची गोडी ।
भोक्तेचि जाणती ते आवडी ॥३॥
निळा म्हणे जाणति संत ।
भक्त तुमचे ते भाग्यवंत ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.