न धरे धीर धरितां मनीं । न संटे वदनीं गुणनाम ॥१॥ आटाहास्यें गर्जना करि । खवळली वैखरी नाटोपे ॥२॥ चरित्राचें उठती भार । जीव्हे अक्षर न संडे ॥३॥ निळा म्हणे लाविला चाळा । न कळे कळा हे तुमची ॥४॥