नका पाहू माझे क्रियाआचरित । भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥ आठवितां नाम नेणें दुजी परी । मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥२॥ गुंतलोसे पाशीं मोह ममता आशा । अहो जगदाधीशा पांडुरंगा ॥३॥ निळा म्हणे करा यावरी कैवार । अहा करुणाकर म्हणोनियां ॥४॥