नका पाहू माझे क्रिया – संत निळोबाराय अभंग – ७१७
नका पाहू माझे क्रियाआचरित ।
भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥
आठवितां नाम नेणें दुजी परी ।
मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥२॥
गुंतलोसे पाशीं मोह ममता आशा ।
अहो जगदाधीशा पांडुरंगा ॥३॥
निळा म्हणे करा यावरी कैवार ।
अहा करुणाकर म्हणोनियां ॥४॥