मन माझें बैसलें ध्यानीं । तुमचे चिंतनीं नामाचिये ॥१॥ ऐक्यासनिं स्थिरावलें । आठवी पाऊलें निरंतरत ॥२॥ तैसीच नामीं रंगली वाणी । करीत घोकणी सर्वदा ॥३॥ निळा म्हणे नेणति करणें । तुम्हाविण भूषणें दुजीं लेऊं ॥४॥