मन माझें बैसलें ध्यानीं – संत निळोबाराय अभंग – ७१५
मन माझें बैसलें ध्यानीं ।
तुमचे चिंतनीं नामाचिये ॥१॥
ऐक्यासनिं स्थिरावलें ।
आठवी पाऊलें निरंतरत ॥२॥
तैसीच नामीं रंगली वाणी ।
करीत घोकणी सर्वदा ॥३॥
निळा म्हणे नेणति करणें ।
तुम्हाविण भूषणें दुजीं लेऊं ॥४॥