मागें उदंड साधनें केलीं । उत्तीर्ण तीं झालीं कर्मफळें ॥१॥ परि तुमचें नेदितीच प्रेम । वाढविती श्रम संसारींचा ॥२॥ जया नाहीं मार्गाची ठावा । काय तें गांवा पावविती ॥३॥ निळा म्हणे काटवणीं । घालती घालणीं जाणिवेच्या ॥४॥