मागें उदंड साधनें – संत निळोबाराय अभंग – ७१४
मागें उदंड साधनें केलीं ।
उत्तीर्ण तीं झालीं कर्मफळें ॥१॥
परि तुमचें नेदितीच प्रेम ।
वाढविती श्रम संसारींचा ॥२॥
जया नाहीं मार्गाची ठावा ।
काय तें गांवा पावविती ॥३॥
निळा म्हणे काटवणीं ।
घालती घालणीं जाणिवेच्या ॥४॥