मागें उदंड जोडी केली ।
कोठें आली सांगातें ॥१॥
आतां पुरे नाम वाचें ।
सार्थकाचें कारण ॥२॥
कोठे जाऊं खाऊं फेरे ।
मतांतरें अनेकें ॥३॥
आतां पुरे नाम वाचे ।
सार्थकाचें कारण ॥४॥
कोठें जाऊं खाऊं फेरे ।
मतांतरें अनेक ॥५॥
निळा म्हणे नारायणा ।
भाव जाण अंतरींचा ॥६॥