मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥ नामचि तुमचें पुरे देवा । न करुं हेवा आणिक ॥२॥ माझें आहे स्वाधीन मन । न इच्छी मान धन कांहीं ॥३॥ निळा म्हणे सत्य साचा । हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥