मागण्याची न करुं – संत निळोबाराय अभंग – ७१२
मागण्याची न करुं गोष्टीं ।
तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥
नामचि तुमचें पुरे देवा ।
न करुं हेवा आणिक ॥२॥
माझें आहे स्वाधीन मन ।
न इच्छी मान धन कांहीं ॥३॥
निळा म्हणे सत्य साचा ।
हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥
मागण्याची न करुं गोष्टीं ।
तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥
नामचि तुमचें पुरे देवा ।
न करुं हेवा आणिक ॥२॥
माझें आहे स्वाधीन मन ।
न इच्छी मान धन कांहीं ॥३॥
निळा म्हणे सत्य साचा ।
हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥