बैसलें आसनीं – संत निळोबाराय अभंग – ७११

बैसलें आसनीं – संत निळोबाराय अभंग – ७११


बैसलें आसनीं ।
रुप चित्ताचे चिंतनीं ॥१॥
दुजें नाठवे सर्वथा ।
आण तुझी पंढरीनाथा ॥२॥
डोळियां आवडी ।
रुपीं तुमच्या तयां गोडी ॥३॥
निळा म्हणे जीवनकळा ।
वेधीं वेधल्या त्या सकळा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बैसलें आसनीं – संत निळोबाराय अभंग – ७११