बुध्दि जिहीं अढळ – संत निळोबाराय अभंग – ७१०

बुध्दि जिहीं अढळ – संत निळोबाराय अभंग – ७१०

बुध्दि जिहीं अढळ केली ।
चरणीं तुमचे निक्षेपिली ॥१॥
तया विसंबाल कैसे ।
कवळिलेति निजमानसें ॥२॥
प्राणपानांची ही गती ।
कुंठित केल्या इंद्रियवुत्ती ॥३॥
निळा म्हणे कायावाचा ।
नेमूनि निर्धारीं तुमचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बुध्दि जिहीं अढळ – संत निळोबाराय अभंग – ७१०