बहुतां दिवसां भेटीं आलों – संत निळोबाराय अभंग – ७०९

बहुतां दिवसां भेटीं आलों – संत निळोबाराय अभंग – ७०९

बहुतां दिवसां भेटीं आलों ।
सांभाळिलें पाहिजे ॥१॥
आलिंगने निवती प्राण्‍ ।
सुफळ जिणें मग माझें ॥२॥
हेत मनींचा होईल पूर्ण ।
दृष्टीं चरण देखतां ॥३॥
निळा म्हणे हरेल शीण ।
बोळवण जन्माची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बहुतां दिवसां भेटीं आलों – संत निळोबाराय अभंग – ७०९