बरवा ओढवला हा रंग – संत निळोबाराय अभंग – ७०७

बरवा ओढवला हा रंग – संत निळोबाराय अभंग – ७०७

बरवा ओढवला हा रंग ।
भक्तिप्रसंग तुमचा ॥१॥
तेणें सुखें मातली वाचा ।
नित्य कीर्तनाचा नटनाच ॥२॥
गाऊं वानूं आपुल्या छंदें ।
तुमचीं पदें आवडीं ॥३॥
निळा म्हणे गळती नयन ।
प्रेमें स्फुंदन सद्रद ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बरवा ओढवला हा रंग – संत निळोबाराय अभंग – ७०७