हरिकीर्तनाच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७०५

हरिकीर्तनाच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७०५

हरिकीर्तनाच्या योगें ।
आम्हांसी जगें जाणिजे ॥१॥
नाहीं तरी होतों ठावा ।
कोठें देवा कोणासी ॥२॥
जेवीं वोहळासी प्रतिष्ठा ।
पावतां तटा गंगोदका ॥३॥
निळा म्हणे प्रकाशदिप्ती ।
चंद्रज्योती वन्हिसंगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हरिकीर्तनाच्या योगें – संत निळोबाराय अभंग – ७०५