संत कैसेनि भेटती – संत निळोबाराय अभंग – ७०३

संत कैसेनि भेटती – संत निळोबाराय अभंग – ७०३

संत कैसेनि भेटती ।
कैसेनि होती कृपावंत ॥१॥
सांगा निगुती हे आम्हांसी ।
तुमच्या पायांसी लागतों ॥२॥
काय तें करावें पूजन ।
काय तें धन समर्पावें ॥३॥
निळा म्हणे शरण जावें ।
कैसें विनवावें कोण युक्ती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत कैसेनि भेटती – संत निळोबाराय अभंग – ७०३