सर्वकाळ जागवीन – संत निळोबाराय अभंग – ७०२

सर्वकाळ जागवीन – संत निळोबाराय अभंग – ७०२

सर्वकाळ जागवीन ।
आळवीन सुस्वरें ॥१॥
नामें तुमचीं अहो देवा ।
श्रीमाधवा गोविंदा ॥२॥
करीन हेचि दास्य कोडें ।
कीर्तन पुढें आवडी ॥३॥
निळा म्हणे येईल मना ।
दया हो वरदाना तेव्हां मज ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वकाळ जागवीन – संत निळोबाराय अभंग – ७०२