सत्याक्षरें माझी वाणी – संत निळोबाराय अभंग – ७००
सत्याक्षरें माझी वाणी ।
प्रवर्तली गुणीं तुमचिया ॥१॥
दाविले ते तुम्हीं अर्थ ।
वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥
नाहीं कांहीं मतांतरीं ।
वदली वैखरी हे माझी ॥३॥
निळा म्हणे हे वाकयपूजा ।
गरुडध्वजा प्रत्यर्थ ॥४॥