ब्रम्हा विचार करी मनी – संत निळोबाराय अभंग ७०
ब्रम्हा विचार करी मनी ।
ठकडा मोठा हा चक्रपाणी ।
आता येईल आंचवणी ।
तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥
एकांचे सीत उदंड याचें ।
पोट भरणें नाही साचें ।
वचन पूजणें नारदाचें ।
म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥
तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण ।
आजिचिया जेवणा अंचवण ।
न घेई तो आम्हां सज्जन ।
जिवलग प्राण निजांचा ॥३॥
गोंवळ म्हणती भलाभला ।
मनींचाचि हेत जाणितला ।
आजीचिया धणी जो जो धला ।
तो तो पावला समाधीसुखा ॥४॥
ऐसें बोलानियां गोंवळ ।
बैसले आत्मस्थितीचि निश्रचळ ।
तंव ब्रम्हा डोहीं करी तळमळ ।
कां पां न येतिची आझुनी ॥५॥
मग डोकाउनी बाहेरी पाहें ।
मागुती जळी लीन होये ।
म्हणे मी ब्रम्हा आणि विचंबला ठाय ।
धिग महत्व ते माझें ॥६॥
चोरुनियां वत्सें गोंवळ ।
नेंऊ आडवूं हा गोपाळ ।
सत्ता बळें घेऊनि कवळ ।
मग ते देऊं याचें या ॥७॥
ऐसें विचारुनियां परमेष्टी ।
राहिला निश्रचळ कातरदृष्टी ।
निळा म्हणे हेंही जगजेठी ।
हदगत तयाचें ॥८॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.