वेडें वांकुडें बोलिलें ।
निळा पाहिजे उपसाहिलें ॥१॥
देवा तुम्ही रमाकांत ।
भक्त तुमचे चरणांकित ॥२॥
सूर्य जेवीं नव्हे किरण ।
सागर लहरीं तो समान ॥३॥
निळा म्हणे तूं व्यापक ।
भक्त एकदेशी क्षुल्लक ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.