विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥ धरुनियां दृष्टीपुढें । रुप चोखडें सुरेख ॥२॥ वारंवार क्षणक्षणां । ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥ निळा म्हणे पुरवा कोड । जाणेनी चाड हे माझी ॥४॥