विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें – संत निळोबाराय अभंग – ६९७
विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें ।
ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥
धरुनियां दृष्टीपुढें ।
रुप चोखडें सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणां ।
ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
जाणेनी चाड हे माझी ॥४॥